कोणास ठाऊक
कसा ? पण सिनेमात
गेला ससा !
सशाने हलविले
कान, घेतली
सुंदर तान,
सा, नि, ध,
प, म, ग, रे,
सा, रे, ग,
म, प
दिग्दर्शक
म्हणाला, "वाहवा
!", ससा म्हणाला,
"चहा हवा !"
कोणास ठऊक कसा
पण सर्कशीत
गेला ससा !
सशाने मारली
उडी, भरभर चढला
शिडी
विदुषक म्हणाला,
"वा छान !",
ससा म्हणाला,
"काढ पान !"
कोणास ठाऊक
कसा पण शाळेत
गेला ससा !
सशाने म्हंटले
पाढे
भरभर वाचले
धडे
गुरुजी म्हणाले,
"शाब्बास !",
ससा म्हणाला,
"करा पास !"
|