डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी

आला भरून पाऊस, नको एकटा जाऊस
अरे सरी कशासाठी, तुला बिलगून भ्जून जाण्यासाठी

नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी, तुला आठवून भरून येण्यासाठी

वेल मोहरून आली, फुले अंगभर झाली
वारा कशासाठी, गंध वनातून पाखरू होण्यासाठी

असा तुझा भरवसा, चांदण्याचा कवडसा
ओठ कशासाठी, थोडे थरारून जुळून जाण्यासाठी
 
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - यशवंत देव
स्वर - अनुराधा पौडवाल, अरुण दाते
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.