शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला ?
प्रीती का देई साद ही मजला ?

दिसे कुणी मज पुन्हा लपते, ग
घुमते का शीळ इथे ?
पदरी मी भास खुळे जपते, ग
हलले का पान तिथे ?
वारा हा काही सांगतो मजला !

ओळखीची खूण काही पटते, ग
नच झाली भेट जरी
डोळियांच्या पापणीत मिटते, ग
उमटे जे बिंब उरी
येती या चाहुली कशा मजला ?
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - अनिल-अरुण
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - नाव मोठं लक्षण खोटं (१९७०)
For the printable version of this song, click here.