तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा
गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे
बट हळवी वाऱ्यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला
पवनातुनी शीतलता दाटुनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे धुंद धुंद झाला
ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटुनी पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला
गीत
-
शांताराम नांदगावकर
संगीत
-
अरुण पौडवाल
स्वर
-
अनुराधा पौडवाल,
सुरेश वाडकर