नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी !

दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी
अननुभूत माधुरी आज गीत गायने

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी
घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी

कोण बाइ बोलले, वाणि ही प्रियंवदा
या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा
कशास वेगळेपणा, जवळ ये विलासिनी
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - उषा अत्रे, सुधीर फडके
चित्रपट - उमज पडेल तर (१९६०)
For the printable version of this song, click here.