एक लाजरा न्
साजरा मुखडा,
चंद्रावानी
खुलला ग
राजा मदन हसतोय
कसा कि जीव
माझा भुलला
ग
ह्या एकांताचा
तुला इशारा
कळला ग
लाज आडवी येती
मला कि जिव
माझा भुलला
ग
नको रानी नको
लाजू, लाजंमदी
नको भिजू
हितं नको तितं
जाऊ, आडोशाला
उबं ऱ्हाऊ
का? ............
बघत्यात !
रेशिम विळखा,
घालुन सजना,
नका हो कवळुन
धरू
लुकलुक डोळं,
करुन भोळं,
बगतंय फुलपाखरू
कसा मिळवा पुन्हा
साजनी मोका
असला ग
डोळं रोखुन,
थोडं वाकुन,
झुकू नका हो
फुडं
गटर्गुम गटर्गुम
करून कबूतर
बघतंय माज्याकडं
लई दिसानं सखे,
आज ह्यो धागा
जुळला ग
बेजार झाले
सोडा सजणा,
शिरशिरि आली
अंगा
मधाचा ठेवा
लुटता लुटता,
बघतोय चावट
भुंगा
मनात राणी तुझ्या
कशाचा झोका
झुलला ग ?
|