काटा रुते कुणाला
आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे
हा दैवयोग आहे
!
सांगू कशी कुणाला
कळ आतल्या जिवाची
?
चिरदाह वेदनेचा
मज शाप हाच
आहे !
काही करु पहातो
रुजतो अनर्थ
तेथे
माझे अबोलणेही
विपरीत होत
आहे !
हा स्नेह, वंंचना
की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी
मी रिक्तहस्त
आहे !
|