मन पिसाट माझे
अडले रे,
थांब जरासा
!
वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे
मिणमिणले;
मधुजाल तमाने
विणले रे,
थांब जरासा
!
ही खाली हिरवळ
ओली;
कुजबुजून बोलू
बोली;
तिमिराची मोजू
खोली रे,
थांब जरासा
!
नुसतेच असे
हे फिरणे
नुसतेच दिवस
हे भरणे
नुसतेच नको
हुरहुरणे रे,
थांब जरासा
!
|