हलके हलके जोजवा,
बाळाचा पाळणा
पाळण्याच्या
मधोमध फिरतो
खेळणा
सजली ग मऊ मऊ,
मखमालीची शैय्या
निजली ग बाळाची,
गोरी गोरी काया
बाळ रुपडे देवाचे,
भुलविते लोचना
खेळवा लाडानं,
गोपा बायांनो
गोविंद घ्या,
गोपाळ घ्या,
म्हणा सयांनो
नाव ठेवा नवसाचा,
हा राजा देखणा
कुर्रर्र करा
कानात हळूच
भेटा ग
बारशाचा सोहळा
घुगऱ्या वाटा
ग
आज बाई इंद्राचा
दरबार ठेंगणा
|