विठ्ठल तो आला,
आला, मला भेटण्याला
मला भेटण्याला
आला, मला भेटण्याला
तुळसी-माळ घालुनि
गळा कधी नाही
कुटले टाळ
पंढरीला नाही
गेले चुकूनिया
एक वेळ
देव्हाऱ्यात
माझे देव त्यांनी
केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या
धूळ रोज लावी
कपाळाला
सत्य वाचा माझी
होती वाचली
न गाथा पोथी
घाली पाणी तुळशीला
आगळीच माझी
भक्ती
शिकवण जन्माची
ती बंधुभाव
सर्वांभूती
विसरून धर्म
जाति देई घास
भुकेल्याला
|