कसं काय पाटील
बरं हाय का,
अहो बरं हाय
का ?
काल काय ऐकलं,
ते खरं हाय
का ?
अहो राव तुम्ही,
ते नाही तुम्ही,
चष्मेवाले तुम्ही
न्हाय, न्हाय,
न्हाय, न्हाय,
फेटेवाले तुम्ही
सांगा काय ऐकलं
ते खरं हाय
का ?
काल म्हनं तुम्ही
जत्रंला गेला,
तमाशात काळिज
इसरुन आला
खरं काय हो
पाटील ?
इसरल्या ठायी,
गावलं का न्हाई,
आज तरि संगती
आणलंय का ?
काल म्हनं तुम्ही
तालुक्याला
गेला, कमरंचा
ऐवज हरवून आला
आरंरं
केली वाटमारी,
सांजंच्या पारी,
आज काय शिल्लक
ऱ्हायलंय का
?
काल म्हनं तुम्ही
हितं-तिथं गेला,
अन् बघता बघता
घोटळा झाला
आगं बया बया
काय झालं पुढं,
सांगा तरि थोडं,
खाली नका बघु
आता लाजताय
का ?
|