धक्का लागला ग मघाशी कुणाचा
तोल सावरेना बाई अजुनी मनाचा

उगा हासला तो उगा लाजले मी
करी वीज त्याच्या उरी भाजले मी
ठसा राहीला ग मुक्या भाषणाचा

पुढे चालले मी फिरे पाय मागे
कशाची कळेना अशी ओढ लागे
सुटे त्यात वारा खुळ्या श्रावणाचा

झरू लागल्या ग ढगातून धारा
मनीच्या विजेचा मनी कोंडमारा
ठिकाणा तरी कुठे साजणाचा

भिजे पावसाने जरी अंग सारे
उफाळून येती उरीचे निखारे
शिरे नाद अंगी जणू पैंजणाचा
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - जगाच्या पाठीवर (१९६०)
For the printable version of this song, click here.