चल उठ रे मुकुंदा,
झाली पहाट झाली
!
बाहेर चांदण्याला
हलकेच जाग आली
!
मंदावला कधीचा
गगनात शुक्रतारा
अन् चोरपावलांनी
आला पहाटवारा
गालांवरी उषेच्या
आली हळूच लाली
!
घे आवरून आता
स्वप्नांतला
पसारा
बेचैन गोकुळाने
केला तुझा पुकारा
तव गीत गात
सारी ही पाखरे
उडाली !
तुज दूर हाक
मारी कालिंदिचा
किनारा
कुंजांतल्या
फुलांनी केला
तुला इशारा
तुज शोधण्यास
वेडी राधा पुन्हा
निघाली !
|