तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा
सुभग सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्ण कमळे
पाचुमण्याच्या किरणासम ही हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती

शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्ह, श्रीपती
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - स्नेहल भाटकर
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - अन्नपूर्णा (१९६८)
राग - भूप, देसकार (संगीत यात्रा)
For the printable version of this song, click here.