गजाननाला वंदन करूनी
सरस्वतीचे स्तवन करोनी
मंगल शिवपद मनी स्मरोनी
सद्भावाने मुदित मनाने
अष्टांगांची करूनि ओंजळ
वाहतो ही दुर्वांची जुडी

अभिमानाला नकोच जपणे
स्वार्थासाठी नकोच जगणे
विनम्र होऊन घालव मनुजा
जीवन हे हर घडी

विघ्न विनाशक गणेश देवा
भावभक्तीचा हृद्यी ठेवा
आशिर्वाद हा द्यावा मजला
धन्य होऊ दे कुडी

पार्वती नंदन सगूण सागरा
शंकर नंदन तो दुःख हरा
भजनी पुजनी रमलो देवा
प्रतिमा नयनी खडी
 
 
गीत - बाळ कोल्हटकर
संगीत - बाळ कोल्हटकर
स्वर - सुरेश वाडकर
नाटक - वाहतो ही दुर्वांची जुडी (१९६४)
For the printable version of this song, click here.