कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता
बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा
कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारू
उतरी पैलपारू भवनदीची
कृष्ण माझे, मन कृष्ण माझे जन
सोईरा सज्जन कृष्ण माझा
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा
वाटो ना करावा परता जीवा
रचना
-
संत तुकाराम
संगीत
-
वसंत देसाई
स्वर
-
पं. उदयराज गोडबोले
नाटक
-
प्रीतीसंगम (१९७१)