जय गंगे भागिरथी ! हर-गंगे भागिरथी !

चिदानंद-शिव-सुंदरतेची
पावनतेची तू मूर्ती
म्हणुनि घेउनी तुला शिरावर
गाइ महेश्वर तव महती !

जगदाधारा तव जलधारा
अमृतमधुरा कांतिमती
’शंकर शंकर, जय शिवशंकर’
लहरि लहरि त्या निनादती !
 
 
गीत - विद्याधर गोखले
संगीत - वसंत देसाई
स्वर - प्रसाद सावकार
नाटक - पंडीतराज जगन्नाथ (१९६०)
राग - कलावती (नादवेध)
For the printable version of this song, click here.