पडला पदर खांदा
तुझा दिसतो
ग
कमरेला कमरपट्टा
कसतो ग बाई
कसतो
काळ्या कुरळ्या
वेणीत मरवा
जरतारी शालू
हिरवा
गोऱ्या दंडात
बाजूबंद खुलतो
सफरचंदाची गाली
गुलाली
फुटलं डाळींब
ओठांच्याखाली
राघू नाकात
नुसताच रुसतो
तुझ्या तरुणपणाला
गंधार
मार भिवईंची
काळी कट्यार
घाव वर्मावरी
असा बसतो
|