ज्वानीच्या
आगीची मशाल
हाती,
आले मी
अवसंच्या भयाण
राती
काजवा उडं,
किर्किर किडं,
रानात सुरात
गाती
दिलाचा दिलवर,
जिवाचा जिवलग
कुठं दिसंना
मला, ग बाई
बाई, कुठं दिसंना
मला
कुठं दिसंना,
इथं दिसंना,
तिथं दिसंना
शोधु कुठं,
शोधु कुठं,
शोधु कुठं ?
दिसला ग बाई
दिसला
मला बघून गालात
हसला ग बाई
हसला
गडी अंगानं
उभा नी आडवा
त्याच्या रूपात
गावरान गोडवा
तेजाळ मुखडा,
सोन्याचा तुकडा
काळजामंदी घुसला,
ग बाई बाई काळजामंदी
घुसला
माझ्या राजाचा
न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा
देतोय् कौल
लहरी पटका,
मानेला झटका
भाला उरी घुसला
ग बाई बाई भाला
उरी घुसला
अंगा-अंगाची
करते अदा
आग आगीवर झाली
फिदा
उडंल भडका,
चढंल धुंदी
जीव जीवा फसला,
ग बाई बाई जीव
जीवा फसला
|