आला ग बाई आला ग बाई आला ग
आला, आला, आला, आला
पाडाला पिकलाय्‌ आंबा

वासाचा गुण, तुम्ही जाणा वो पाव्हनं
जावू नका, गुण तुम्ही जाणा, वो पाव्हनं
वो पाव्हनं जरा थांबा, अरे घे
पाडाला पिकलाय्‌ आंबा

भारानं वाकलंय्‌ झाड
त्याला मी बाई जीवापाड
रात दिन आजवर जपलंय्‌
चोर खडा मारण्या टपलंय्‌
उघड कसं सांगू सांगा
अवं, पाडला पिकलाय आंबा

आंब्याचा रंग केशरी
वर लाली शोभे शेंदरी
तोंडाला तुझ्या पानी सुटं
घेऊन टाक लगी लगी
काढ ते मी चल
घुटमळू नको तू बाबा
ज्ञानबा, पाडाला पिकलाय्‌ आंबा
 
 
गीत - तुकाराम शिंदे
संगीत - तुकाराम शिंदे
स्वर - सुलोचना चव्हाण
For the printable version of this song, click here.