काल पाहिले
मी स्वप्न गडे
नयनी मोहरली
ग आशा
बाळ चिमुकले
खुदकन हसले
मीही हसले,
हसली आशा
काल पाहिले
मी स्वप्न गडे
भाग्यवतीचे
भाग्य उजळले
कुणीतरी ग मला
छेडिले
आणि लाजले,
हळूच वदले
रंग सावळा तो
कृष्ण गडे
इवली जिवणी
इवले डोळे
भुरुभुरु उडती
केसहि कुरळे
रुणुझुणु रुणुझुणु
वाजति वाळे
स्वप्नि ऐकते
तो नाद गडे
|