उठ झाला प्रातःकाल, तुझे गोपाल आले, वननिळा
पूर्व दिशे उदेला भानू, आला उद्याचळा

प्राणीमात्र पशू पक्षी, विश्रांत वृक्षी, अपुल्या स्थळी
निद्रा सारून जागृत होती पंच उषःकाळी

रावे मयुरे, संश साया, सुस्वर मुख कमळी
सद्भावे तुज ख्याती गाती स्वमुखे नामावळी

कनकाचे घट शिरी, यमुना तिरी, जाती जळा
पूर्व दिशे उदेला भानू, आला उद्याचळा
 
 
गीत - शाहीर परशराम
संगीत - वसंत पवार
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट - शाहीर परशराम (१९६१)
For the printable version of this song, click here.