या पाण्यावर देव वाहिला, साक्षी ही पाऊले
मी तुमची जाहले, जिवलगा मी तुमची जाहले

चल ग राणी, हिरव्या रानी, गुलुगुलू गोष्टी करू
चला नदीच्या तीरी राया, वाळूवरती फिरू
मंजुळवाणे ऐकीव गाणे, मन त्याला भुलले

चल ग राणी, रात चांदणी, चांदण्यात न्हाऊ
झाडाखाली मल्हारातील, प्रीत गीत गाऊ
जा राहुनही, सूर सुखाचे तुझीया ओठातले
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - माणिक वर्मा, पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट - मानाचं पान
For the printable version of this song, click here.