तुला न कळले,
मला न कळले
कसे प्रीतिचे
धागे जुळले
!
ते डोळ्यांचे
पहिले मीलन
ते पहिले स्मित,
ते संवेदन
शब्दाहुन ते
गोड मुकेपण
कसे कळीचे फूल
उमलले ?
थोडी लज्जा,
थोडी भीती
ओढ अनावर, आतुरता
ती
कशी जागली हृदयी
प्रीती ?
कसे मनातुन
गीत उजळले ?
स्पर्ष लाजरा
होता पहिला
काळ थांबुनी
उभा राहिला
कणाकणातुन वसंत
फुलला
कुणीकुणाला
कसे जिंकिले
?
|