जीवा-शीवाची
बैल जोडं, लावील
पैजंला आपली
कुडं
डौल मोराच्या
मानाचा रं,
डौल मानाचा
येग रामाच्या
बानाचा रं,
येग बानाचा
तान्या-सर्जाची
हं नाम जोडी
पुना होवीस
हाती घोडी,
माझ्या राजा
रं
धरती आबाळाची
चाकं
त्याच्या दुनवेची
हो गोडी
सुर्व्या-चंद्राची
हो जोडी
त्याच्या सर्गाची
रं माडी, सर्गाची
माडी
सगळी शंकराची
माया
इष्णू लक्षिमीचा
राया
सूर परकरतीची
जोडी
डाव परपंचाचा
मांडी, माझ्या
राजा रं
|