जा जा, रानीच्या
पाखरा, तू जा,
रं, भरारा
तुला घालिते
चारा, तुला
घालिते चारा
द्यावा संदेसा
म्हायेरा, तू
जा, रं, भरारा
!
दूर डोंगरपल्याड
नदीकाठी माझा
गाव
तिथं नांदतुया
द्येव नरसुबाराव
लहान-थोरांसी
मायेचा तोच
आसरा !
बाई, म्हयेराचं
थोरपन वानु
कसं ?
पुन्यवंत माझं
मायबाप द्येव
जसं
गंगा निर्मळ
मायेचा व्हातोया
झरा !
माझ्या खुशालीचा
सांगावा दे
माउलीला
पड पाया तिच्या,
सांग, येती
याद मला
तुला भेटाया
जीव हुतो माझा
घाबरा !
|