रातिची झोप
मज येइना
की दिस जाइना
जा जा जा
कुणितरी सांगा
हो सजणा !
लागली श्रावणझड
दारी
जिवाला वाटे
जडभारी
अशी मी राघुविण
मैना
की झाली दैना
जा जा जा
कुणितरी सांगा
हो सजणा !
एकली झुरते
मी बाई
सुकली ग पाण्याविण
जाई
वाटते पाहु
मनमोहना
की मन राहिना
जा जा जा
कुणितरी सांगा
हो सजणा !
कठिण किति काळिज
पुरुषाचे
दिवस मज जाती
वर्षाचे
जाउनी झाला
एक महिना
की सखा येइना
जा जा जा
कुणितरी सांगा
हो सजणा !
|