जय देवी मंगळागौरी सुवासीन मी तुला पुजिते

कुंकुम तिलक माझ्या ललाटी
मंगल मणी ह शोभत कंठी
रत्न पाचूचा चुडा मनगटी
स्त्रीजन्माचे अहीव लेणे
तुझ्या कृपेने मला लाभते

शीव शंकराहुनी प्रेमळ भोळा
दिधलासी पती तू भाग्यवतीला
देहाच्या देव्हारी पूजीन त्याला
हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती
अमृत तेजाळ प्रीत जळते
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - कन्यादान (१९६०)
For the printable version of this song, click here.