शब्दावाचुन
कळले सारे शब्दांच्या
पलिकडले
प्रथम तुला
पाहियले आणिक
घडू नये ते
घडले
अर्थ नवा गीतास
मिळाला
छंद नवा अन्
ताल निराळा
त्या दिवशी
का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले
?
होय म्हणालिस
नकोनकोतुन
तूच व्यक्त
झालीस स्वरातुन
नसता कारण व्याकुळ
होऊन उगिच हृदय
धडधडले
आठवते पुनवेच्या
रात्री
लक्ष दीप विरघळले
गात्री
मिठीत तुझिया
या विश्वाचे
रहस्य मज उलगडले
|