माझे जीवन गाणे,
माझे जीवन गाणे
!
व्यथा असो आनंद
असू दे
प्रकाश किंवा
तिमीर असू दे
वाट दिसो अथवा
न दिसू दे,
गात पुढे मज
जाणे !
कधी ऐकतो गीत
झऱ्यातुन
वंशवनाच्या
कधी मनातुन
कधि वाऱ्यातुन,
कधि ताऱ्यांतुन
झुळझुळतात तराणे
!
तो लीलाघन सत्य
चिरंतन
फुलापरी उमले
गीतातुन
स्वरास्वरातुन
आनंदाचे नित्य
नवे नजराणे
!
गा विहगांनो
माझ्यासंगे
सुरांवरी हा
जीव तरंगे
तुमच्यापरि
माझ्याहि स्वरांतुन
उसळे प्रेम
दिवाणे !
|