विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे, वचन आठवीता

स्वैर तू विहंग, अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरिची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊ नको नाथा
 
 
गीत - ज. के. उपाध्ये
संगीत - यशवंत देव
स्वर - आशा भोसले
सुधा मलहोत्रा (आकाशवाणीवरील मूळ प्रसारण)
राग - मालकंस, जोगकंस (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.