कंठातच रुतल्या
ताना, कुठे
ग बाई कान्हा
कुणीतरी जा,
जा, जा, जा,
घेउनि या मोहना
कदंब-फांद्यावरी
बांधिला, पुष्पपल्लव-गंधित
झोला
कसा झुलावा,
परि हा निष्चल,
कुंजविहारीविना
थांबे सळसळ
जशि वृक्षांची,
कुजबुज सरली
झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर
कानि न येता,
थबके ही यमुना
मुरलीधर तो
नसता जवळी,
सप्तस्वरांची
मैफल कुठली
?
रासक्रिडेची
स्वप्ने विरली,
एका कृष्णाविना
|