हरिनाम मुखी रंगते
एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते

घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा
तूच यदुनाथा, सदा आसू द्यावा
इतुकचि मागणे, तुझ्यापाशी मी मागते

काम, क्रोध, मत्सर, कधी ना पाहिले
लोभ मोह सारे, दूर मी सारिले
हरीच्याच चिंतनी, जीवनास मी वाहते

दिनरात लावू दे, भक्तिचाच दीप
तुझ्या सहवासी, सरो भवताप
मनाच्या या मंदिरी, तुझे रूप साठविते
 
 
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - आशा भोसले
For the printable version of this song, click here.