रघुपति राघव
गजरी गजरी
तोडित बोरे
शबरी
ध्यानी जपली
मनी पूजिली
रघुनाथाची मूर्त
सावळी
बघावयाला याच
डोळी
आतुरलेली किती
अंतरी
रामनाम ते वदता
वाचे
अमृत लाघव अधरी
नाचे
हाती येता फळ
भक्तीचे
चाखित होती
नाम माधुरी
भजनी रमुनी
भिल्लिण शामा
म्हणते लवकर
ये रे रामा
आलिंगुनीया
भक्ति प्रेमा
स्वर्ग बघू
दे मला भूवरी
|