जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहाते

डोंगर दरिचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे
प्रीत नदी एकरुपते

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी
धुंदीत यौवन जिथे डोलते

बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी उर्मी उठती
सुख दुःखाची जेथ सारखी
प्रीत जीवना ओढ लागते
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - पुत्र व्हावा ऐसा (१९६१)
राग - यमन (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.