प्रथम तुज पाहता,
जीव वेडावला, उचलुनी घेतले, नीज रथी मी तुला
स्पर्ष होता तुझा, विसरलो भान मी,
धुंद श्वासातला, प्राशिला गंध मी,
नयन का देहही, मिटूनी तू घेतला
जाग धुंदीतूनी, मजसी ये जेधवा,
कवळूनी तुजसी मी, चुंबीले तेधवा,
धावता रथ पथी, पळभरी थांबला
गीत
-
ग. दि. माडगूळकर
संगीत
-
सुधीर फडके
स्वर
-
रामदास कामत
चित्रपट
-
मुंबईचा जावई (१९७०)
राग
-
कलावती
(नादवेध)