हरि, तुझी कळलि
चतुराई
हरी रे, भुलायची
मी नाही !
गायीमागे गोप
दवडुनी
लाखांमधली एक
निवडुनी
आडरनि या मला
अडवुनी
दाविसी धिटाई
!
गरीब भोळ्या
जरी गवळणी
खोडी काढिता
होउ नागिणी
बळेच घेसी निंदा
ओढुनि
काय रे तऱ्हा
ही !
मी न एकटी इथे
मोहना
जिवंत पुढती
वाहे यमुना
धावुन येईल
माझ्या वचना
हिरवी वनराई
!
|