अर्ध्या रात्री झोप मोडिशी
खराच कधी तू येशिल का ?
ओळख करुनी घेशिल का ?

खिडकीपाशी उभा राहुनी
हसशील का हळू मला पाहुनी
सर्वांगाने पीत चांदणे,
प्रीत गीत तू गाशिल का ?

मंतरलेल्या तुझ्या स्वरांनी
मी मग होईन वेड्यावाणी
भारावुन मी येता पुढती,
हातच हाती घेशिल का ?

हसेल नभीचा चंद्र दहादा
दटावणी हा दाविल पडदा
विचारीन मी काही बाही,
होकार हसरा देशील का ?
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - बायको माहेरी जाते (१९६३)
For the printable version of this song, click here.