धुंद मधुमती रात रे, नाथ रे,
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे, नाथ रे

जल लहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येइ प्रियकरा, येइ मंदिरा
अलि रमले कमलात रे, नाथ रे

ये रे ये का मग दूर उभा ?
ही घटिकाहि निसटुन जायची
फुलतील लाखो तारा,
परि ही रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि
कटीभंवती धरि हात रे, नाथ रे
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - मा. कृष्णराव
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - किचक वध (१९५९)
राग - भूप (संगीत यात्रा)
For the printable version of this song, click here.