आई व्हावी मुलगी
माझी, मी आईची
व्हावे आई
नको बोलणी खारट,
आंबट, विटले
विटले बाई
सूर्यापूर्वी
उठा सकाळी,
चहा ऐवजी दूध
कपाळी
आंघोळीच्या
वेळी चोळा,
डोईस शिक्केकाई
’केस कोरडे
कर ग पोरी’,
सात हात त्या
जटा विंचरी
’नको पावडर
दवडू बाई’,
कोकलते ही आई
शाळेनंतर पुन्हा
शिकवणी, रोजचीच
ती फुका जाचणी
लहान भावादेखत
अगदी कान पकडते
बाई
|