शूर अम्ही सरदार
अम्हला काय
कुनाची भीती
?
देव, देश अन्
धर्मापायी प्राण
घेतलं हाती
!
आईच्या गर्भात
उमगली झुंजाराची
रीत
तलवारीशी लगिन
लागलं जडली
येडी प्रीत
लाख संकटं झेलुन
घेइल अशी पहाडी
छाती !
झुंजावं वा
कटुन मरावं
हेच अम्हाला
ठावं
लढुन मरावं
मरुन जगावं
हेच अम्हाला
ठावं
देशापायी सारी
इसरू माया ममता
नाती !
|