अजि मी ब्रम्ह पाहिले

अगणीत सुरगण वर्णिती ज्याला,
कटिकर नटसम, चरण विटेवरी, उभे राहिले

एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी
खांदी कावड, आवड मोठी, पाणी वाहिले

चोखामेळ्याची ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्वता
जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले

दामाजीची रसद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरली
अमृतराय म्हणे कैसी माऊली, संकटा वारिले
 
 
रचना - संत अमृतराय महाराज
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - आशा भोसले
राग - जयजयवंती (नादवेध)
 
मूळ अभंग
 
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.