या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी !

दिवस जाय बुडुन पार
ललित नभी मेघ चार
पुसट त्यास जरिकिनार
उसवि तीच सांज खुळी !

शेष तेज वलय वलय
पावे तमि सहज विलय
कसले तरि दाटे भय
येइ तूच तम उजळी !

येइ, बैस, ये समीप
अधरे हे नयन टीप
दोन ज्योति एक दीप
मंद प्रभा मग पिवळी !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - ऊन पाउस (१९५४)
For the printable version of this song, click here.