झाला महार पंढरिनाथ
काय सांगू देवाचि मात !

नेसला मलिन चिंधोटी
घेतली हातामधे काठी
घोंगडी टकिली पाठी
करी जोहार दरबारात !

मुंडाशात बांधिली चिठी
फेकतो दुरुन जगजेठी
’दामाजीनं विकलि जी कोठी
त्याचं घ्यावं दाम पदरात !’

खळखळा ओतिल्या मोहरा
’घ्या जी मोजून, पावती करा’
ढीग बघून चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडात !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - पुढचं पाऊल (१९५०)
राग - काफी (संगीत-सरिता)
For the printable version of this song, click here.