प्रभात समयो पातला, आता जागवा विठ्ठला
दारी तव नामाचा चालला गजरू
देव देवांगना गाती, नारद तुंबरू
दिंड्या पताकांचा मेळा, तुझीया अंगणी थाटला
दिठी दिठी लागली तुझीया श्रीमुख कमलावरी
श्रवण मुखी रंगली श्रीधरा नामाची माधुरी
प्रणांची आरती, काकडा नयनी चेतविला
गीत
-
ग. दि. माडगूळकर
संगीत
-
सुधीर फडके
स्वर
-
चित्रपट
-
संत जनाबाई (१९४९)
राग
-
भूप
,
देसकार
(नादवेध)