आठवणींच्या
आधी जाते
तिथे मनाचे
निळे पाखरू
खेड्यामधले
घर कौलारू
हिरवी श्यामल
भवती शेती
पाउलवाटा अंगणि
मिळती
लव फुलवंती
जुइ शेवंती
शेंदरि आंबा
सजे मोहरू
चौकट तीवर बाल
गणपती
चौसोपी खण स्वागत
करती
झोपाळ्यावर
अभंग कातर
सवे लागती कड्या
करकरू
माजघरातिल उजेड
मिणमिण
वृद्ध कंकणे
करिती किणकिण
किणकिणती हळु
ये कुरवाळू
दूर देशिचे
प्रौढ लेकरू
|