माझ्या कोंबड्याची शान कोंबड्याची शान, माझ्या कोंबड्याची शान
छाती काढून तुरतुरा, तुरा डोईवर छान

भल्या पहाटे उठतो आपण, उंच घुमवीतो तान
याचे गाणे ऐकून येते, निजल्या जगता भान

पिळली जाई तोवर राही, ताठच याची मान
घरी नांदता कुटुंब याचे, अन्नाची ना वाण
संतानावर याच्या जगते, देशाचे संतान
 
 
गीत - भालजी पेंढारकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट - नवरा बायको (१९५०)
For the printable version of this song, click here.