काही तरी तू बोल
तुझे बोलणे झिरपत जाईल
मनात माझ्या खोल

हसून बोल की वद रागेजून
चिडून बोल की थोडी लाजून
असेल तसला असो दागिना
सोन्याताच तर असते मोल

फिरव अंगुली, छेड सतार
असो शंकरा, असो बहार
मधूरपणाची तहान आम्हा
राग रागिण्या साऱ्या फोल

तुच धाडशी तुषार चार
पाऊस पडू दे वारंवार
रखरखल्या रानी राणी
पिकं होऊ दे किंवा ओल
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट - आधार (१९७०)
For the printable version of this song, click here.