नंदाघरी नंदनवन फुलले
बोल बोबडे श्रीरंगाचे
गोकुळात घुमले
रिंगण घाली शाम सावळा
बाळकृष्ण तो रांगत आला
हात धरुनी चालु लागला
पुढे पुढे ग, पाउल पडले
हात चिमुकला उंच नाचवी
छुमछुम वाळा मधुर वाजवी
स्वतः हासुनि जगास हसवी
कौतुक करते गोकुळ सगळे
गीत
-
योगेश्वर अभ्यंकर
संगीत
-
दशरथ पुजारी
स्वर
-
सुमन कल्याणपूर