गजानना श्री
गणराया, आधी
वंदू तुज मोरया
!
मंगलमूर्ती
श्री गणराया,
आधी वंदू तुज
मोरया !
सिंदुरचर्चित
ढवळे अंग, चंदनऊटी
खुलवी रंग
बघता मानस होते
दंग, जीव जडला
चरणी तुझिया
गौरीतनया भालचंद्रा,
देवा कृपेच्या
तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा,
अवघी विघ्ने
नेसी विलया
|